हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी (वय ६२ रा. काळेवाडी) हे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुकानातील १४ लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते.गाडीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला धक्का देऊन खाली पाडत त्याच्याकडील १४ लाख रुपये लुटले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजपाहण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकीवरून फिरताना दिसत होते. पोलिसांनी त्यांची माहिती काढली असता ते सुहास व आदित्य असल्याचीमाहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी परीसरातून दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांना अटक करताच त्यांचे साथीदार अमन व गणेश हे त्यांचा फोन बंद करून फरार झाले.यातील अमन व गणेश हे सांगवी, निगडी येथील तीन गुन्ह्यात फरार होते. तर यापूर्वी गणेश याच्यावर १० गुन्हे, अमन वर 3 व आदित्य वर 1 गुन्हा दाखल होता. आरोपींना हा गुन्हा कट रचून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्यादोघानांही ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुहास नवनाथ जोगदंड (वय २२, रा.पिंपरी), आदित्य संतोष घायतडक (वय २१, रा.पिंपरी), अमन आजिम शेख (वय २०, रा.पिंपरी), गणेश भंगाकांबळे (वय २१, रा.काळेवाडी) अशी अटक आरोपींचा नावे आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीसनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीसहवालदार संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दिपक साबळे, आतिश जाधव, प्रमोद कदम, वंदु गिरे, पोलीस नाईक प्रशांत गिलबिले, अतिकशेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलिस शिपाई विनायक घारगे,रमेश खेडकर, सागर पंडित यांनी हि कारवाई केली.
— गणेश मारुती जोशी ( हिंदीजागार न्यूज, पुणे )