हिंदजागर न्यूज प्रतिनिधी पुणे – छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ठिकाणी दररोज ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली लाखोंरुपयांची लूट होत आहे. एकमिंनिटाच्या या खेळावर लाखोंरुपयांची उलाढाल होताना दिसत आहे परंतु पोलीस प्रशासन बागायची भूमिका बजावत आहे.
छत्रपती शिवाजीनगर हे अवैध धंद्याचे माहेरघर तर बनलेले असून येथे खुलेआम मटका, जुगार,चंगड, सुरू आहे. पाटील इस्टेट येथून मोठ्या प्रमाणात गांजा व्यवसाय केला जातो व गांजा व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते त्यातच भर ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली खुलेआम गोरगरीब जनतेची लूट सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये येथे अवैध धंदेवाले मोठ मोठे अड्डे थाटून बसले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे की यात ४० टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे. अवैद्य दारू विक्री जुगार व वरली मटका रोज चालतो. त्यामुळे संपूर्ण परिसरातील लहान -लहान मुले व विद्यार्थी देखील दारु व जुगाराच्या आहारी गेले आहेत. परिणामी येथील विद्यार्थी व प्रतिष्ठीत लोकाचे जिवन जगने अति कठीण झाले आहे.शिवाय लहान मुले दारू व जुगाराच्या आहारी गेल्याने त्यांचे जिवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे,त्यामुळे या परिसरातील सर्व महिला मानसिक तणावामुळे त्रस्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरी वरील बाबीची योग्यरित्या त्वरीत चौकशी करून अवैध दारु, जुगार, वरली मटका चालविणार्यांना कठोर शासन करावे व सर्व महिलाना तसेच प्रतिष्ठीत विद्यार्थी व व्यक्तींना न्याय मिळावा, अशी मागणी राज्याचे पालकमंत्री यांना निवेदनातून करण्यात येणार असून, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा प्रस्तुत निवेदनातून देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन व येथील पोलीस चौकी पासून अवघ्या जवळच मागील कित्तेक दिवसापासून हा अवैध धंद्याचा अड्डा भरविण्यात येत असताना पोलिसांना हा अड्डा दिसत नाही याचा आश्चर्य आहे. पुणे पोलीस आयुक्तातील सामाजिक न्याय विभागाने या आधी सुद्धा अनेक वेळा याच जुगाराच्या अड्ड्यांवर व ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे तरीसुद्धा या लोकांवर पोलिसांचा वचक काय बसल्या तयार नाही!!! सदरक्षणाचा प्रकाश देणार्या पोलीस चौकीच्या दिव्याखालीच हा अंधार असल्यामुळे छत्रपती शिवाजीनगर मध्ये कायदा व सुव्यवस्था कशी असेल याचा अंदाज येतो हा अवैध मटका जुगार ऑनलाईन लॉटरी, गांजा व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैद्य धंदे सारखनी येथे खुलेआम सुरूअसल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )