हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – १ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमा अनुयायांसाठीशासनाने पाण्याचा टँकर च्या ऐवजी पॅक बंद बॉटलमध्ये पाणी वाटण्याबाबत व स्तंभाजवळ बॅरिकेट काढून सर्वसामान्य नागरिकांना स्तंभापर्यंत पोहोचून अभिवादन करता येईल अशी व्यवस्था करावी अशी या निवेदनामध्ये संविधान ग्रुपचे श्री.सचिन गजरमल यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .
आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी करतो की आपण जर एक जानेवारी रोजी पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित दादा पवार यांना आणि आमचे म्हणणे याची नोंद घेतली नाही तर त्यांना शौर्य स्तंभाला अभिवादन करू देणार नाही व त्यांना घेराव घालणार व याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील. – श्री.सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुप महाराष्ट्र राज्य )
गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रशासनाला सांगत आहोत की भीमा कोरेगाव एक जानेवारी शौर्य स्तंभाला येणाऱ्या अनुयायांसाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा करू नये तिथे पॅक बंद बॉटल ने पाणीपुरवठा करण्यात यावा यामध्ये शासनाचा दिसूळ कारभार दिसून येतो व जातिवाद पानाची सुरुवात सुद्धा होते सर्व अधिकाऱ्यांसाठी तिथे पाण्याच्या बॉटल ची व्यवस्था केली जाते पण सर्वसामान्य भीम सैनिकांना मात्र टॅंकरने पाणी दिले जाते असे लक्षात आले. गर्दी असल्यामुळे टँकर आत येऊ शकत नाही लोकं पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात त्यामुळे शासन भीमा कोरेगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करत असून साधी लोकांची पाण्यासाठी वणवण दूर करू शकत नाही एवढं मात्र लक्षात येते .
— प्रदीप कांबळे ( हिंदजागर न्यूज, पुणे )