HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर करून देखील आता मैत्रीपुर्ण लढत होताना दिसत आहे. अशातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे.या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे. पण हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजप देखील आग्रही होता. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असला तरी वडगाव शेरी मतदारसंघावरील दावा भाजपने सोडलेला नव्हता. भाजपने या मतदारसंघात निवडणुक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले होते.
जगदीश मुळीक यांना पक्षांनी दिला एबी फॉर्म ??
पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे आणि ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
वडगाव शेरीचे विद्यमान उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे हे आहेत. टिंगरे यांचं नाव कल्याणीनगरच्या पोर्शे प्रकरणात आल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र टिंगरेंचं नाव दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये जाहीर झालं. त्यानंतर पुन्हा जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जगदीश मुळीक यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू ठेवली असल्याचं बोललं जातं होतं. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचं जगदीश मुळीक यांनी सांगितले होते. आता घडामोडींना वेग आला आहे.
आता वडगाव शेरीमध्ये मैत्रीपुर्ण लढत होण्याच्या चर्चा सुरू आहेत. आज भाजप पक्षाकडून जगदीश मुळीक यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, यामुळे आता वडगावमध्ये मित्रपक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
—— Ganesh Maruti Joshi.