HindJagar News – Repoter – PUNE – मुंबईबाहेरुन आलेल्या 58 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश अखेर सोमवारी काढण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी त्यांची प्रतीक्षा संपली आणि विविध पोलीस ठाण्यात त्यांची पोस्टिंग दाखविण्यात आली आहे.या सर्व पोलीस अधिकार्यांनी तातडीने त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर मुंबईसह इतर शहरातील बहुतांश पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक बदल्या मुंबई पोलीस दलात झाल्या. काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या बहुतांश पोलीस अधिकार्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे ऐन निवडणुकीत मुंबईतील बहुतांश पोलीस ठाण्यात प्रमुखपदी अधिकारीच नव्हता. त्यामुळे निवडणूक प्रचारासह मिरवणूक तसेच इतर राजकीय कार्यक्रमांदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या बदल्यांच्या विरोधात काही अधिकारी मॅटकडे गेले होते, मात्र मॅटकडून संबंधित पोलीस अधिकार्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे ते सर्व अधिकारी बदल्यांच्या ठिकाणी रुजू झाले होते. परिणामी, मुंबई शहरात बदल्या करण्यात आलेले बहुतांश पोलीस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर सोमवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
यात 58 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या पोलीस अधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील रमेश भामे यांची अंधेरी पोलीस ठाणे, शैलेंद्र नगरकर यांची मालवणी, जयराम रनवरे यांची कस्तुरबा मार्ग, सदाशिव निकम यांची आंबोली, राहुल सोनावणे यांची विलेपार्ले, जिलानी कादर सय्यद यांची वाकोला, सचिन कोतमिरे यांची डोंगरी, सुशीलकुमार शिंदे यांची भायखळा, संतोष चौधरी यांची डी. एन नगर, विवेक सोनावणे यांची दहिसर, शाम आपेट यांची आझाद मैदान, चंद्रकांत सरोदे यांची एल. टी मार्ग, बाळासाहेब पवार यांची चेंबूर, सुधीर चव्हाण यांची वनराई, जितेंद्र पाटील यांची भोईवाडा, अशोक कांबळे यांची वरळी, शिवानंद देवकर यांची व्ही. बी. नगर, मिलिंद सांबळे यांची मेघवाडी, मंगेश अंधारे यांची आरे, प्रकाश मासाळ यांची दिडोंशी, कुमारगौरव धादवड यांची डोंगरी, राहुलकुमार पाटील यांची आझाद मैदान, नवी मुंबईचे अजय कांबळे यांची नागपाडा, अविनाश काळदाते यांची घाटकोपर, श्रीकांत धरणे यांची धारावी, माणिक नलावडे यांची शाहूनगर, तानाजी भगत यांची गोवंडी, रमेश जाधव यांची वडाळा टी टी, निर्मला पाटील यांची व्ही. पी रोड, संजय चव्हाण यांची एमआयडीसी, चंद्रकांत लांडगे यांची आरसीएफ, सुनिल शिंदे यांची पार्कसाईट, संजय जोशी यांची कांजूरमार्ग,बागवान अंजून कासिम यांची आरसीएफ, सुनिल कदम यांची कांजूरमार्ग, गिरीधर सिताराम गोरे यांची भोईवाडा, जगदीश शेलकर यांची काळाचौकी, देवेंद्र पोळ यांची व्ही. बी नगर, वैशाली गलांडे यांची वडाळा टी टी, अनिल पाटील यांची मलबार हिल, नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनिल बच्चाव यांची विशेष शाखा एक, मानपाड्याचे संजय नाळे यांची चेंबूर, अकोला पीटीसीचे सचिन खोंद्रे यांची डी. एन नगर, मरोळ पीटीसीचे श्रीकांत आदाटे यांची कफ परेड, भास्कर पवार यांची पश्चिम नियंत्रण कक्ष, खंडाळा पीटीसीचे सुरेखा घारगे यांची निर्मलनगर, दिपाली मरळे यांची खार, कोल्हापूरच्या पुष्पलता मंडले यांची निर्मलनगर, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अशफाक अहमद शेख यांची बांगुरनगर, सोलापूरचे ऋषिकेश पवळ यांची गोरेगाव, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अरविंद कांबळे व कुंडलिक गाढवे यांची अनुक्रमे बांगुरनगर, ठाण्याचे विठ्ठल चौगुले यांची कुरार, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अरविंद पाटील यांची येलोगेट, नाशिकचे नंदराज पाटील यांची खार, रा. नि. क. महाराष्ट्र राज्याचे मोहम्मद शफीक खाजाहुसैन बागवान यांची ताडदेव आणि नारायण पडवळ यांची आझाद मैदान पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
——– Ganesh Maruti Joshi.