HindJagar News – Remoter – PUNE – काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळेच पुण्यातील मतदारसंघांमध्ये बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे. आता याचा परिमाण अधिकृत उमेदवारांवर होईल, ही शोकांतिका आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली. पुण्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर यातून विनाकारण आव्हान उभे राहिले आहे, असेही ते म्हणाले.
किर्दत म्हणाले की, पुण्यातील शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट तसेच पर्वती विधानसभा या जागा आघाडीला मिळू शकतात. बरोबर तिथेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आणि अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणले आहे. भारतीय जनता पक्ष प्रणीत केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाला विरोध म्हणून आम आदमी पार्टीने लोकसभेला इंडिया या काँग्रेस प्रणीत आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला उमेदवार उभे न करता पाठिंबा दिला. आता राज्यात विधानसभा निवडणुकीतही एकही उमेदवार उभा केला नाही, तर सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. असे असताना काँग्रेस साधी बंडखोरी थांबवू शकत नाही याचा अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्नही किर्दत यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि पक्ष
१ : दत्ता बहिरट – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२ : लतिफ शेख : बहुजन समाज पार्टी
३ : सिद्धार्थ शिरोळे – भारतीय जनता पार्टी
४ : अँथोनी ॲलेक्स – भारतीय युवा जन एकता पार्टी
५ : सुनील गोरे – स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
६ : फिरोज मुल्ला – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
७ : शुभम जडागळे- बहुजन भारत पार्टी
८ : परेश सिरसंगे – वंचित बहुजन आघाडी
९ : श्रीकांत सोनवणे – जनता दल (सेक्युलर)
१० : अजय शिंदे – अपक्ष
११ : मनीष आनंद – अपक्ष
१२ : अंजुम इनामदार – अपक्ष
१३ : विजय जगताप – अपक्ष
बंडखोरीमुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का ?????
पुण्यातील शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट तसेच पर्वती विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा नक्कीच महायुतीला होणार आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वरिष्ठांनी नेत्यांची मनधरणी करत माघार घेण्यास सांगितले. तसेच पुढील काळात विधानपरिषदेवर अथवा येत्या निवडणुकीत संधी दिली जाईल असे आश्वासनही दिले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी विधानसभा लढवणाऱ्या नेत्याला पाठिंबा देण्याचे ठरवले. मात्र काँग्रेसमध्ये हे घडले नाही. नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही. अक्षरशः काँग्रेसच्या अध्यक्षांना या बंडखोरांना अल्टिमेटम द्यावा लागला. पण तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला पुण्यात धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.
शिवाजीनगरमधून काॅंग्रेसतर्फे दत्ता बहिरट यांना तिकीट देण्यात आले आहे. येथून काॅंग्रेसच्याच मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. काॅंग्रेससह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मनधरणी करूनदेखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने शिवाजीनगरमध्येही काॅंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकी तीन पक्ष एकत्रित आल्याने नाराजांची संख्या वाढली आहे. इच्छुक असताना उमेदवारी न मिळाल्याने तसेच मतदारसंघ मित्र पक्षाला सुटल्याने नाराज असलेले नेत्यांनी पक्षाची बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या बंडोखोरांना थंड करण्यासाठी पक्षाकडून विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. परंतु काही बंडखोरांना थंड करण्यात काही पक्षांना अपयश आले. कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.