HindJagar News – Repoter – PUNE – आज राज्यातील विधानसभेसाठीच्या 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं आहे. नागरिक मतदान केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान करताना दिसले. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे.दरम्यान आता उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद आहे. 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी पुण्यातील दोन मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांचे बॅनर झळकले आहेत. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.
कोणत्या मतदारसंघात झळकले बॅनर?
पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ 2014 पासून भाजपचा किल्ला आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी 2019 साली काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 44.95 टक्के मतदान झाले आहे. मात्र, निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाचे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत.
तर दुसरीकडे मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर, मनसेचे उमेदवार मयुरेश रमेश वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोडके सचिन यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मात्र, निकालाआधी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढली आहे. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघातील उमेदवारांसह नागरिकांचं लक्ष्य निकालाकडे लागलं आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.
शहरातील आठ मतदारसंघातील दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
वडगाव शेरी 50.46 टक्के.
शिवाजीनगर 44.95 टक्के.
कोथरूड 47.42 टक्के.
खडकवासला 51.56 टक्के.
पर्वती 48.65 टक्के.
हडपसर 45.02 टक्के.
पुणे कॅन्टोन्मेंट 47.83 टक्के.
कसबा पेठ 54.91 टक्के.
Author – Ganesh Maruti Joshi.