HindJagar News – Repoter – PUNE – लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड स्टारला धमक्या येत होत्याच. आता पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता, यांना धमकी आल्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकारानंतर सलमान खानलाही लॉरेन्स बिश्नोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिली होती तसेच पुण्यातील एक सराफ व्यवसाय कला सुद्धा धमकी आली असल्याचे समजते.
संबंधित सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याप्रकरणी पुणे पोलीस यांच्याकडून कलम 308(4), 351(3)(4) बीएनएस अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणे यावा अशी मागणी करण्यात आली आहे .
तसेच पुणे शहरातील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची याबाबत चर्चा केली आहे व उद्या सकाळी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.या धमक्यांना मी घाबरत नसल्याचे धमकी आलेल्या सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितले. तसेच भीती आणि द्वेष असे काही नाही. आपल्यात सत्य बोलण्याची हिंमत आणि लढण्याची इच्छाशक्ती आहे.मरण्याच्या तयारीत आहे. पण मी मानवतेचे मार्ग कमकुवत होऊ देणार नाही. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडीन.
लॉरेन्स गॅंग कडून पाठवलेल्या धमकी पत्रामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त यांना कळवून सामाजिक कार्यकर्त्याला मारणार असल्याचे पत्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. पुण्यात दहशतीचा हा नवाच पॅटर्न सुरु झाला असून पुणे पोलीस अशा गुडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत का??? त्यामुळं पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा खरोखरच बाजार उठला आहे.पुण्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहिला नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
शहर आणि परिसरात एकीकडे कोयता गँगची दहशतीमुळे भीतीचं वातावरण असतानाच दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, खून,चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.
महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्नांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण होऊ लागलीत. गुंडांच्या टोळ्याच्या दहशत देखील वाढली आहे. गुन्हेगारीला कुठूनतरी बळ मिळत आहे आणि त्यातून पुण्यात असुरक्षिते वातावरण निर्माण होताना दिसते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहन तोडफोड, दहशत माजवणे, खून आणि खूनाचे प्रयत्नाच्या घटना वाढल्या आहेत. दोन गटातील वर्चस्व, वाद आणि टोळी युद्धातून घटना घडल्याचे दिसत आहे. ३ घटनांमध्ये जामीनावर बाहेर आलेल्या आरोपींचा समावेश समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी शहरातील वाढत्या घटनांबाबत आढावा घेतला. त्यात शहरात गेल्या ५ वर्षांमध्ये तब्बल ७५६ गुन्हेगार जामीनावर बाहेर आल्याचे समोर आले आहे. मोक्का, एपीडीए तसेच खून, खूनाचे प्रयत्न व दहशत माजवणे यासह गंभीर गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. बहुतांश आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची यादी तयार केली गेली आहे. गुन्हे शाखेकडून या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
——– Ganesh Maruti Joshi.