HINDJAGAR- NEWS – MUMBAI – मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत एकूण 70 ते 80 प्रवाशी होते. या घटनेमध्ये एका प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला आहे.इतर प्रवाशांना सुखरूपणे बचावण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा येथे जाणारी निलकमल नावाची फेरीबोट उरण कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्य चालू आहे. पण यावेळी आणखी एक घटना घडली. प्रवाशांना समुद्रातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची एक बोट घटनास्थळी पोहोचली. पण तिथे उभ्या असलेल्या एका छोट्या बोटीला धडकली. सुदैवाने यावेळी कुणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशी हे सुखरुप आहे. आतापर्यंत ६ प्रवाशांना गेट ऑफ इंडिया जवळील कुलाबा पोलीस ठाणे येथे आणण्यात आलेले आहे.
News Repoted By – P. S. SURYANSHI..