हिंदजागर प्रतिनिधी – राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करण्याची गरज नव्हती. वातावरण उन्हाने तापलेलं आहे. स्वत: आप्पासाहेबांना राजभवनावर बोलावून पुरस्कार देता आला असता.आताच्या दिवसात एवढ्या लोकांना बोलावून पुरस्कार देण्याची गरज नव्हती. झाली ती गोष्ट दुर्देवी आहे. कसं कुणाला जबाबदार धरणार कळत नाही. सकाळी न करता संध्याकाळी कार्यक्रम केला असता तर प्रसंग टाळता आला असता, असं राज ठाकरे म्हणाले.
- हेतूपूर्वक केलं नाही
- या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे का? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर हे हेतूपूर्वक कोणी केलेलं नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करावा असं मला वाटत नाही. कार्यक्रमाला इतर लोकांना बोलावण्यापेक्षा राजभवनावर बोलावून पुरस्कार दिला असता तर हा प्रसंग टाळता आला असता, असंही ते म्हणाले. राजकीय स्वार्थासाठी हा कार्यक्रम घडवून आणल्याचा आरोप होत आहे, असं विचारलं असता, राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिसवाल त्यांनी केला.
आयसीयूत कुणाला पाठवू नये
आयसीयूत मी जात नाही. कुणालाही आयसीयूत पाठवू नये. आयसीयूतील रुग्णांना आपण भेटू नये. बाहेरच्या लोकांना भेटून आलो. रुग्णालय त्यांचं काम आहे, असं सांगतानाच एकूण ७१ लोक अत्यवस्थ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यांच्यापैकी ११ जणांचा या रुग्णालयात मृत्यू झाला. तशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचं राज ठाकरे म्हणाले.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )