हिंदजागर प्रतिनिधी –दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच निरनिराळे फोटो व्हिडीओ शेअर करतात. सतत चर्चेत येण्यासाठी अनेकजण स्टंटदेखील करताना दिसतात जे काहीवेळा त्यांच्याच अंगलट येतात. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी व्हिडीओ बनवणाऱ्या मुलींच्या राड्याचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये त्या जोरदार भांडण करत आहेत.
मुलींच्या हाणामारीची समोर आलेली घटना पुण्याची आहे. चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवत केसांना धरुन ओढत नेत मारहाण केली. ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. मुलींविषयी तक्रार दाखल झाल्यावर गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून या मुलींना सोडून दिलं.
“राडा….कंपनी…गँगस्टर.. विषय करायचा नाय ताई” असे व्हिडिओ ला नाव देऊन व्हिडीओ व्हायरल शेअर केला होता. या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे, समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे हे त्यांचे काम. व्हिडिओ शेयर करून आपली इमेज बनवतात. प्रसिद्ध होण्यासाठी या घटनेचे चित्रिकरण करुन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होतादरम्यान, सोशल मीडियावर दिवसभरात अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. मग ते चांगलं असो किंवा वाईट. अनेकदा त्यांचे स्टंट त्यांच्यावर भारी पडतात. अशा घटना घडण्याचे प्रमाण अधिक होत चाललं आहे.