हिंदजागर प्रतिनिधी – आयपीएल 2023 मध्ये 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. यात मुंबईने राजस्थान विरुद्धच्या थरारक सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला असून कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाचं गिफ्ट दिल आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील 1000 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने 124, जॉस बटलरने 18, संजू सॅमसनने 14, जेसन होल्डरने 11 धावा केलया. या सामन्यात फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मधील तिसरे शतक ठोकले असून त्याने हे शतक केवळ 53 चेंडूत पूर्ण केले.
राजस्थान रॉयल्सने मुंबई विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 212 धावा केल्या तर मुंबई इंडियन्सला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सकडून सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली. परंतु बर्थ डे बॉय कर्णधार रोहित केवळ 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून ईशान किशनने 28, कॅमेरन ग्रीनने 44, सूर्यकुमार यादवने 55, तिलक वर्माने 29 तर टीम डेव्हिडने 45 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करून आयपीएलमधील त्याचे 18 वे अर्धशतक ठोकले. अखेरच्या ओव्हरमध्ये टीम डेव्हिडने झुंजार खेळी करत शेवटच्या 3 चेंडूत 3 षटकार ठोकून मुंबई इंडियन्स समोरील विजयाचे आव्हान पूर्ण केले, आणि मुंबई इंडियन्सने या सामन्यात विजय मिळवला.
- श्री.प्रदीप कांबळे ( प्रतिनिधि )