पुणे प्रतिनिधी – मुंबई पाठोपाठ पुण्यातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे.यावर्षीचा उन्हाळा महाराष्ट्रभराला बेजार करत आहे. त्यातल्या-त्यात पुणे-मुंबई सारखी महत्त्वाची शहरे यात होरपळून निघत आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
पुणे शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे.पुण्यात काल 18 मे रोजी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते तर कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस होते.आज 19 मे रोजी दुपारी 1 नंतर पुण्याच्या तापमानात वाढ होणार असून तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे असेल असा अंदाज आहे.सकाळी तापमान 24 अंश सेल्सिअस असेल आणि निरभ्र आकाश असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.उन्हाचा पार वाढत असल्यामुळे महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.