हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता कोथरूड येथील अनेक हॉटेल धारकांनी पावसाळी पत्र्याचे शेड उभारले आहे त्यावर बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून बसले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता श्री. निलेश प्रकाश निकम यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली असता हे धक्कादायक बाब समोर आली . पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अलीकडेच टेरेस वरील उभारलेले बेकायदेशीर शेड काढण्याची मोहीम हातात घेतली आहे आणि कोथरूड येथील मुख्य रस्त्यावर असलेले कॉलिटी हॉटेल ( करिष्मा चौक ) , अभिषेक रेस्टॉरन्ट अँड बार ( मेहेंदळे गॅरेज चौक ) , ग्लोबल पंजाब ( नॉन स्टॉप चौक ) येथील व इतर.
काही हॉटेल चालकांनी तर पार्किंगच्या असलेली जागेमध्ये मोठ-मोठे शेड उभारून रस्त्याला हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचे गाड्या उभ्या केल्या जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामच्या समस्यांना स्थानिक लोकांना सामोरे जावे लागते काही हॉटेल धारकांना पोलीस अधिकाऱ्यांची छुपी भागीदारी असल्याचेही माझ्या कानावर आहे त्यामुळे त्यांनी नियमांचे भंग जरी केले तरी त्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे. मला माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती च्या नुसार मी सांगत आहे . तसेच ज्यांनी बेकायदेशीर शेड व मागील अनेक वर्षांपासून पार्किंगच्या जागेत व्यवसाय करून पुणे महानगरपालिकेची फसवणूक केली अशा हॉटेलधारकांची तक्रार करून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची विनंती मा.आयुक्त पुणे महानगरपालिका यांना करणार आहे तसेच यामुळे पुणे महानगरपालिकेचा आर्थिक नुकसान झाले म्हणून माननीय उच्च न्यायालय येथे लवकरच कोथरूड येथील या बेकायदेशीर शेड धारकांविरुद्ध जनहित याचिका दाखल करणार आहे . – श्री.निलेश प्रकाश निकम ( माहिती अधिकार कार्यकर्ता )
याबाबत पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे झोन क्रमांक – ६ चे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तसेच या बेकायदेशीर हॉटेल धारकांवरती दंडात्मक कारवाई व हे बेकायदेशीर त्वरित काढून त्यांच्यावरती नियमानुसार योग्य ते गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री.निकम यांनी केली आहे.
- श्री गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )