हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे शहरातील पाषाण गावातील भगवती नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बनावट तूप बनविणारा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (वय-38 रा पासोड्या विठोबा मंदिर जवळ, बुधवार पेठ, पुणे) हा बनावट तूप तयार करत असताना आढळून आला. पोलिसांनी पाषाण गावातील भगवती नगर येथून तब्बल 650 किलो बनावट भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. तसेच तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
पत्र्याच्या शेडमध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करुन बनावट तूप तयार करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन तब्बल 650 किलो बनावट तूप, 135 किलो तेल, 105 किलो डालडा, 54 पत्र्याचे मोकळे डबे, डबे पॅक करण्यासाठी लागणारी मशिन व झाकण असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला पत्रव्यवहार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परी-४, पुणे शहर शंशीकांत बोराटे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, तपास पथकातील पोलीस अंमलदार बाबा दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, श्रीधर शिर्के, आशिष निमसे, प्रदीप खरात यांनी केली आहे.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक वार्ताहर )