हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणच्या चौकशीत वैद्यकीय शिक्षण विभागातीलच समकक्ष अधिकारी नेमल्याने या समितीवर कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे.निवृत्त न्यायधिशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बुधवारी ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या व त्यानंतर घडलेल्या घडामोडी संदर्भात एक पत्र काढून चौकशी समिती नेमली आहे। या समिती मधे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.या समिती मधे एक अधिष्टता व दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील ने पलायन केल्यानंतर ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला.देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशी साठी समिती गठित केली आहे.परंतु ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स असून या मधून काहीही साध्य होणार नाही असे धंगेकर यांनी मुखमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे अतिशय गंभीर प्रकरण असून या मध्ये अनेक बडे मासे गुतले आहेत.ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या आशीर्वादाने ललित पाटील अनेक दिवस ससून रुग्णालयाचा पाहुंचार घेत होता.या ठिकाणहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यामुळे या प्रकरणात दोषी डॉक्टरावर ही चौकशी समिती कारवाई करू शकणार नाही. त्किंबहुना या डॉक्टरांना वाचवण्याचे काम ही समिती करू शकते. त्यामुळे हा प्रकरणाच्या चौकशी साठी निवृत्त न्यायाधिशच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करावी अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्याकडे केली.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )