भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत से २२ निगडी मधील बहुचर्चित नियोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वारचे काम सध्या युद्ध पातळीवर व अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सदरील प्रवेशद्वाराचे लोकार्पण येत्या बुद्ध पौर्णिमेला होईल अशी माहिती एकंदरीत प्राप्त झाली आहे.जवळपास पाच वर्ष रेंगाळलेला प्रवेशद्वाराचा विषय हा स्थानिक आंबेडकरी समूहाच्या अस्मितेला झाला होता. प्रवेशद्वाराचे काम गुणवत्तापूर्ण तसेच वेळेत पूर्ण व्हावे अशी मागणी वेळोवेळी आंबेडकरी समुदायाच्यावतीने करण्यात आली होती. त्याअनुषंगाने लढा यूथ मूव्हमेंटचे नेते प्रमोद क्षिरसागर यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन बोंबाबोंब आंदोलन देखील केले होते. तसेच सोशल मीडिया च्या माध्यामातून लोकप्रतिनिधींना “जवाब दो” हा ट्रेंड ही राबवण्यात आला होता.भागातील इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रवेशद्वाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे या करिता लोकप्रतिनिधींच्या भेटी घेत पाठपुरावा केला. आणि याच रस्त्यावरील संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला शरण जात आत्ता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.त्यातूनच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.नवनिर्मित बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार असा कुठेही उल्लेख नसल्याने पुन्हा एकदा भागातील कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराचा विषय आत्ता महत्त्वाच्या आणि निर्णायक संघर्षावर येऊन थांबला आहे. प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार असा उल्लेख पूर्वीप्रमाणे असावाच अशी मागणी भागातील आंबेडकरी कार्यकर्ते प्रमोद क्षिरसागर यांनी केली आहे.