हिंदजागर न्यूस प्रतिनिधी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये शाई फेकण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. अजय मैनदर्गीकर असे त्या व्यक्तीचे नाव असून तो भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे.राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरू केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.नुकतंच चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुण्याचं पालकमंत्रीपद काढून घेत त्यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते सोलापूरात आले होते.
आज खाजगीकरणाच्या विरोधात सोलापूर शहराध्यक्ष अजय मेहता यांनी सोलापूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटलांना करून काळे झेंडे दाखवले हे सरकार जर खाजगीकरण करणार असेल तर भीम आर्मी भारत एकता मिशन मी स्वतः सिताराम रामजी गंगावणे प्रदेशाध्यक्ष माझ्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात असा प्रकार होईल यांना काळे झेंड दाखवल्याशिवाय भीम आर्मी सोडणार नाही कारण खाजगीकरण हा युवकांचा पोटाचा प्रश्न आहे आई-वडील जिंदगीभर मुलांना पोटाला खडकी भरून कसे तरी मुलांना शिक्षण देतात आणि या सरकारने मिल्ट्रीत खाजगीकरण पोलिसात खाजगीकरण 187 जागा स्टेट गव्हर्मेंट च्या खाजगीकरण केल्या तर या सर्व खाजगीकरण या विरोधात सरकारला आम्ही फिरू देणार नाही काळ लावून चपलीचा हार घातल्याशिवाय चोरणार नाही आणि याची पूर्ण जबाबदारी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष नात्याने मी स्वीकार – सिताराम रामजी गंगावणे प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी सेना, महाराष्ट्र राज्य.
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधि )