हिंदजागर प्रतिनिधी – राज्याच्या राजकारणा मोठी खळबळ होणार असून, भाजपा+ राष्ट्रवादीची युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत..राजकीय समीक्षक आणि पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ”द न्यू इंडियन एक्सप्रेस”ला आज याबाबत बातमी दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या बेतात आहेत. अजित पवार नवे मुख्यमंत्री असतील. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना पित्ताचा त्रास झाल्यामुळे ‘गायब’ झाले होते. त्यावेळी ते अमित शहांना भेटून आले, असा दावाही सूर्यवंशी यांनी केला आहे.यावेळी शरद पवारांचे आशीर्वाद घ्यावेत जेणेकरून ८० तासांच्या सरकारसारखी नामुष्की येऊ नये, असं राष्ट्रवादीमधले वरिष्ठ नेते नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलले, असं या बातमीत म्हटलं आहे. अर्थातच प्रफुल्ल पटेल ही नवी समीकरणं जुळवून आणत आहेत.
सुधीर सूर्यवंशी तेच ज्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत आधी ट्विट केलेलं होतं आणि लोकांचा विश्वास बसला नव्हता. ‘चेकमेट’ हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक २०१९ च्या राजकीय नाट्यावर आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली ही बातमी म्हणजे राजकीय खळबळ होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून याबाबत कोणाताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत अस्वस्थता आहे, असे चित्र आहे.