हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यात काय घडणार? वसंत मोरे मनेसेचे पहिले खासदार होणार का ? मनसे यंदा पुणे लोकसभा लढणार अशी चर्चा आहे.
पुण्यातील मनसेचा चेहरा वसंत मोरे यांचं नाव लोकसभा उमेदवार म्हणून पुढे आलंय. मनसेच्यावतीनं वसंत मोरे यांना लोकसभेचं तिकीट जवळपास नक्की मानलं जातंय. मनसेचे माजी नगरसेवक माजी शहराध्यक्ष आणि फायरब्रान्ड नेते वसंत मोरे हे खळखट्याक आंदोलनांनी नेहमीच चर्चेत राहिलेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे पोस्टर्स झळकले.खुद्द वसंत मोरे यांनीही पक्षानं संधी दिल्यास पुण्यातून लोकसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पुण्यात मनसेला तसेच वसंत मोरे यांचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसरमधून निवडणूक लढविली होती. पण, त्यांच्या उमेदवारीचा भाजपाला फटका बसला.त्यामुळे येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. पण, आता वसंत मोरे यांनी कबर कसली असून ते थेट लोकसभेच्या रीग्नता उतरणार आहेत. गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजप लोकसभेत कुणाला तिकीट देईल? हे अद्याप निश्चित झालेलं नाही. महाविकास आघाडीतूनही उमेदवार ठरलेला नाही आहे. अशातच मनसेनं वसंत मोरे याचं नाव जाहीर केल्यास पुण्यात काय घडणार हे पाहणं महत्वाचं असेल.
== गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )