हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – नुसता लाल सिग्नल ची लाईट लागलीआणि थोडी जरी पुढे आली तर ऑनलाईन पावती पडत असते. पण इथे मात्र चित्र वेगळेच आहे पुण्यामध्ये रहदारीच्या वेळी सेनापती बापट रोड येथे संध्याकाळी ७ वा पोलिसांच्या चार ते पाच गाड्या तसेच मोठी गाडी नो एन्ट्री तुन समोरचा सिंगल सुटला असताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवत होते त्या चौकामध्ये त्यावेळेस स्थानिक ट्रॅफिक पोलीस उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी सुद्धा नुसती बघायची भूमिका घेतली !!! आता पुणे शहर पोलीस आयुक्त या सर्व गाड्यांवरती कारवाई करणार का ????
मागील आठवड्यामध्ये पी एम पी एल च्या बसने याच ठिकाणी 10 ते 15 गाड्यांना उडवले होते त्यावरती चतुर्शिंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मग आता या पोलीस चालकांनी गाड्या चालवल्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का ???
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )