हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –नुकतेच पुणे महापालिकेने पुण्यातील भटक्या श्वानांची आकडेवारी जाहिर केली अन् त्यातून धक्कादायक बाब उघड झाली. पुण्यातील तब्बल १४ हजार व्यक्तींना या भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचे आकडेवारी त्यात देण्यात आली. दुसरीकडे या भटक्या श्वानांवर देखील क्रुरतेचा फास आवळला जात असल्याचे दिसत असून येत आहे. गेल्या नऊ महिन्यात पुण्यात १० भटक्या श्वानांनासोबत क्रुरतेची वागणूक देण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल असलेल्या तक्रारीवरून दिसत आहे. याप्रकरणात १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या भटक्या श्वानांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.पुणेकर माणसांसोबत प्राण्यांवर अन् निसर्गावर प्रचंड प्रेम करतात. पुण्याच्या मध्यभागापासून वस्त्या आणि नव्या इमारतीत देखील हे पाहिला मिळते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टीही पुणेकरांकडून स्वत:हून केल्या जातात. परंतु, त्याप्रमाणात प्राण्यांवर अत्याचार करणारे तसेच त्यांना क्रुर वागणूक देण्याच्या घटना घडत असल्याचे गेल्या काही वर्षात पाहिला मिळत आहे.
भटक्या श्वानांवर देखील क्रुरतेचा फास आवळला जात असल्याचे दिसत असून येत आहे. गेल्या नऊ महिन्यात पुण्यात १० भटक्या श्वानांनासोबत क्रुरतेची वागणूक देण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल असलेल्या तक्रारीवरून दिसत आहे.कोंढवा भागात एका पाळीव श्वानाच्या पिल्लाला चपलेने मारहाण केली होती. त्याची क्लीप देखील काढली होती. यासोबतच भारती विद्यापीठ परिसरात एका प्रशिक्षकाने श्वानाचा जीव घेतला होता. प्रशिक्षण देताना श्वान हातातून सुटुन गेटकडे गेला या रागातून त्याने या श्वानाला क्रुरतेने लाथांनी मारून व त्याच्या गळ्यातील साखळी जोरात ओढली होती. त्यात या श्वानाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंद केला.तसेच, वाघोली परिसरात फिरस्ता श्वॉन सोसायटीत आल्याने त्याला अमानूष मारहाण करत त्याचा जीव घेतल्याची घटना घडली होती. त्यासोबतच एका कुटूंबाने मुलाच्या प्रेमापोटी २० ते २२ पाळले होते. पण, तो मुलगाच श्वानासारखा वागू लागला आणि एका संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पाहणी केली असता चार श्वान मृत अवस्थेत दिसून आले होते. याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा नोंद केला होता. यासारख्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. काही घटना पोलिसांपर्यंत पोहचल्या नाहीत. तसेच, काही उघडकीसही येत नसल्याचे सांगितले जाते.
श्वानामुळे एका तरुणाचा मृत्यू…
पुण्यात भटक्या श्वानांचा त्रास मोठा असल्याचे बोलले जाते. गेल्या ८ महिन्यात तब्बल १४ हजार जणांना चावा घेतला आहे. या घटनांसोबतच एका तरुणाचा भटके श्वान आडवे आल्याने दुचाकी स्लीप होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यासोबतच उपनगर परिसरात भटक्या श्वानांची संख्या मोठी आहे. रात्री श्वान एखाद्या दुचाकी व पादचाऱ्याचे मागे लागतात. त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यावेळी अनेकांना गडबडीत धावताना पडल्याने जखमी होतात. शहरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत असताना गेल्या अडीच वर्षांत तब्बल ४२ हजार ६६५ हजार जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. यामध्ये एकाही नागरिकाचा रेबीज होऊन मृत्यू झालेला नाही.
असाही श्वानांना त्रास…
शहरातील खड्डे, उघडे ड्रेनेज यांचा वाहन चालकांनाच नव्हे तर श्वानांनाही त्रास होत असल्याचे अनेकवेळा दिसत आहे. यात श्वान, मांजर यांची अग्निशमन दलाकडून अनेकवेळा सुटका केली जाते. हे श्वान व मांजर खड्यात, सोसायट्यांच्या जाळीत तसेच गॅलरीत अडकले जातात.
भटक्या श्वानांची संख्या कमी झाली…
महापालिकेने २०१८ मध्ये भटक्या श्वानांची गणना केली होती. त्यात ३ लाख १५ हजार श्वानांची नोंद झाली होती. तर, २०२३ मध्ये केलेल्या गणनेत ही संख्या कमी होऊन १ लाख ७९ हजार ९४० इतकी झाली आहे. महापालिकेने नसबंदी कार्यक्रम व्यवस्थित राबविल्याने श्वानांची वाढ रोखण्यात यश आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. मात्र, शहरातील भटक्या श्वानांचा त्रास कमी झालेला नाही. पहाटे आणि रात्रीच्या वेळी श्वानांचा हल्ला होत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. २०२१ पासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )