हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – सध्या पुणे महानगरपालिकेच्या अतिविक्रमण विभाग यांच्या रोजच्या दिवशी मोठमोठ्या कारवाई बघायला मिळत आहे पण घोले रोड क्षेत्रीय करण्याच्या हद्दी मध्येच अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता राजरोसपणे व्यवसायकांनी अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे फुटपाथ व बेकायदेशीर शेड बांधून आपला व्यवसाय थाटला आहे पण पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बघण्याची भूमिका घेत आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजेच की चतुर्श्रुंगी मंदिराच्या समोरील असलेले शिवम फ्लोरिस्ट हा व्यवसायक पुणे महानगरपालिकेची कुठली भीती न बाळगता अनेक वर्षांपासून फूटपाथवरच अनधिकृतपणे अतिक्रमण केले व वापरत आहे त्याच्याकडे येणारे ग्राहक यांच्यामुळे त्या जंक्शनला ट्रॅफिक जमत आहेत तरी सुद्धा पालिकेच्या कुठल्याही अधिकारी ची कारवाई करण्याची धाडस होत नाही. तसं बघायला गेले तर नियमानुसार पुणे महानगरपालिकेने हा स्टॉल भाडेतत्त्वावरती न देण्याच्या अटीवरती त्याला परवानगी दिली असताना सुद्धा सदर ठिकाणाचा स्टॉल हा भाड्याने दिला गेला आहे याबाबत अनेक वेळा पुणे महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रारी करून सुद्धा पुणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारची टोस अशी कारवाई न करत सदर स्टॉल धारकाला वेळोवेळी पाठीशी घालत आहे सदर स्टॉलचे मूळ मालक हे पुणे महानगरपालिकेचे माझी सदस्य असल्याकारणाने या सर्व गोष्टी रेटून नेल्या जात आहे व पुरावे सहित तक्रार करून तुझा पुणे महानगरपालिका प्रशासन संबंधित स्टॉल धारका पुढे हातबल आहे असं यातील तक्रारदार निलेश प्रकाश निकम त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत होती. त्या बाबत सातत्याने परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही असं श्री. निकम यांनी सांगितले.
तसेच कुसाळकर पुतळा रोड येथील बालाजी ट्रेडर्स नावाने चालू केलेल्या व्यवसाय करणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शेड भरून आपला व्यवसाय थाटला आहे. एकीकडे नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय कला मात्र अनेक अटीन व शर्तीला सामोरे जावे लागते मग अशा बेकायदेशीर शेड उभारून व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय कला पुणे महानगरपालिकेचे अधिकारी अभय देतात कसे हा मोठा प्रश्नचिन्ह ????
- याबाबत या परिसरातील अतिक्रमण निरीक्षक श्री. शशिकांत यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी या दोन्ही गोष्टींची माहिती घेऊन जर हे बेकायदेशीर असेल तर त्यावरती त्वरित कारवाई करेल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
- एकीकडे पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे सध्या स्थितीला दबंग अधिकारी व नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेत दिसणारे श्री.सुनील कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की जर बांधकाम विभागाची निगडित असेल तर त्यावरती त्वरित कारवाई करू.
आता मात्र हे बघणं की अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करणार का नुसती बघायची भूमिका घेणार.