हिंदजागर न्यूज,पुणे – आंबेगाव तालुक्यात एकूण ३१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी (ता ६) घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे २२ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले.त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने २४ ग्रामपंचायती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदेगटाने आठ ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केल्याचा दावा केला आहे. याबाबत अनुक्रमे
मात्र निरगुडसर येथे मंत्री वळसे पाटलांना आपली जादू व किमया दाखवता आली नाही, तेथील (शिवसेना शिंदे गट) उमेदवार रवींद्र वळसे पाटील यांचे लोकांमधून सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच पारगाव आज शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले.
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुका प्रमुख संतोष डोके व उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावे केले आहेत.महाळुंगे तर्फे घोडा, कानसे, सुपेधर, तळेकरवाडी, पहाडदरा, कोलतावडे, वाळूंजनगर, जारकरवाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) व टाव्हरेवाडी (शिवसेना शिंदेगट) या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच निवडणूक निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये अवसरी बुद्रुक, तांबडेमळा, पिंपरगणे, डिंभे बुद्रुक, चपटेवाडी, फुलवडे, कुशिरे बुद्रुक, जाधववाडी, ठाकरवाडी, गोहे बुद्रुक, पाटण, फलोदे, चास, टाकेवाडी, नांदूर, मांदळेवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.
शिवसेना पक्षाकडे निरगुडसर, चांडोली खुर्द, मांदळेवाडी, जाधववाडी, पारगाव शिंगवे, बोरघर, लोणी, चास या ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करण्यात आला. मांदळेवाडी, चास व जाधववाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट, शिंदे शिवसेना गट व शरद पवार गटाने ही दावा केला आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )