हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – मागील आठवड्यात पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ यांनी सुस रोड येथील पुणे मुंबई हायवे वरील पुणे महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर ठरलेल्या शोरूम वरती मोठी स्वरूपात कारवाई चालू केली होती पण अचानकच एका राजकीय कार्यकर्त्याच्या जागेमध्ये असलेली दुकानांवरती कारवाई आल्यानंतर थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला कारवाई थांबवा म्हणून ही कारवाई थांबवण्यात आली होती ! हिंदजागर न्यूज च्या प्रतिनिधींनी पालिकेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क केला असता त्यांनी सांगितले मशीन बंद पडले पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच झोनच्या अधिकाऱ्यांनी म्हात्रे पुलावरती मात्र मोठ्या स्वरूपात कारवाई केली मग अर्धवट केलेली कारवाई पूर्ण का नाही केली ??? आज यावरती आठवडा उलटून गेला पण पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र कारवाई करण्यास तयार नाही हिंदजागर न्यूज चे प्रतिनिधी या अर्धवट सोडलेल्या कारवाईचा पाठपुरावा घेत असताना बिपिन शिंदे ( कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक – ६ ) हे मात्र आमच्या प्रतिनिधीशी बोलण्यास तयार नाही!!
एरवी मात्र बांधकाम विकास झोन क्रमांक – ६ येथील दबंग व आपल्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जाणारे श्री.सुनील कदम ( उप- अभियंता , बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक – ६ ) हे सुद्धा सध्या आजारी असल्यामुळे सुट्टी वरती आहेत असे बोलले जाते पण वरिष्ठांनी सक्तीच्या रजेवरती पाठवले आहे असं दबक्या स्वरूपात पुणे महानगरपालिकेमध्ये चर्चा आहे !!! श्री.कदम हे कुणाच्याही दबावाला बळी नपडता तसेच नियमत असेल तर ठीक अनियमित असेल तर त्यावरती कारवाई करताना अजिबात मागेपुढे बघणार नाही व पक्षपात न करता नियमानुसार कारवाई करतात म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं का ??? अशी चर्चेला उधाण आली आहेत ..
याच बांधकाम विभाग झोन क्रमांक – ६ मध्ये असलेले अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे त्याबाबत पुराव्या देऊन नागरिकांनी कडून तक्रारी अर्ज करण्यात आलेले आहेत पण त्या ठिकाणी कारवाई मात्र होत नाही .. ही राहिलेली अर्धवट कारवाई पूर्ण कधी होणार ??? या झोन मध्ये अनेक बेकायदेशीर बांधकामा बाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारी अर्जावरती कारवाई होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )