हिंदजागर प्रतिनिधी ,पुणे – पिंपळे गुरव येथील संडे क्रिकेट क्लब आयोजित पुणे यांच्याकडून राजा शिवाजी प्रतिष्ठान चरोली येथील मैदानावरती दिनांक – ८ मार्च २०२४ रोजी सकाळी – ७ :३० ते संध्यालकाळी – ६ वाजे पर्यंत हे या स्पर्धेतील सर्व सामने पांढऱ्या लेदर बॉलवर खेळले जाणार आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक केतन गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांची संपर्क साधले असता माहिती दिली .या स्पर्धेतील प्रथम संघाला व द्वितीय संघाला ट्रॉफीनी सन्मानित केले जाणार आहे. सामने हे 20 षटकांचे असतील.प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फ लंदाज आणि स्पर्धेचा मालिकावीर असे वेगवेगळ्या पारितोषिकांचा वर्षाव खेळाडूंवर होणार आहे. तसेच या स्पर्धेत SJ Sports foundation,Pune Pinnacle XI आणि Synechron Technology असे 3 संघ सहभागी होत असून सामने लीग पद्धतीने खेळवले जातील.