हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी काकी म्हणून सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन… अजितदादा माझ्याबद्दल नौटंकी बोलले होते. अजित दादा यांनी स्वीकारलं आहे. 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता ब्रम्हदेव आले तरी आता त्यांच्या पक्षात फूट पडणार आहे. हे निश्चित आहे. निवडणूक लढत असताना जी यंत्रणा होती ती पक्षाची होती. भाजपबरोबर गेल्याने त्यांना नाकारलं, असं आमदार रोहित पवार म्हणाले.
अजित पवार गटावर निशाणा
एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाकडून कुणीही सहभागी झालेलं नाही. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यमंत्रिपद आमच्या पक्षाला शोभणार नाही. तर अजितदादा यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल…, असं ते म्हणाले. अजित दादा यांच्याकडे नेते विकासनिधीसाठी गेले आहेत. काही जणांवर ईडी आणि सीबीआय चालू होती. बाकीच्या नेते आणि सोडून जातील म्हणून घरातील खासदार पद दिलं आहे, असं रोहित पवार म्हणाले. दरम्यान युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होतेय. यावर त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय भूमिका त्यांनी घेतली. मला वाटत नाही. कोर्टात आरक्षण टिकवायचं असेल. तर खासदार यांना विनंती आहे की 50 टक्के प्रश्न घेऊनच जावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केला आहे, असं रोहित पवार म्हणाले.
जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर आमच्यात वाद आहे असं कोण म्हणलं? आम्ही दोघांनी कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलंय. मीडियाने वेगळं वळण दिलं. माझा स्वभाव स्पष्ट असल्याने वेगळं वळण दिलं गेलं, असं रोहित पवार म्हणाले