हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे – बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावरील कचरा आदी समस्यांबाबत नागरिकांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका अधिकारी यांनी आज (मंगळवारी) विस्तृत चर्चा केली.
या चर्चेत विविध हौसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. औंध बोपोडी परिसरातील बंद पथदिवे, रस्त्यांवर टाकला जाणारा राडारोडा, फूटपाथ वरील अनधिकृत टपऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दारू पिणाऱ्यावर कारवाई व्हावी, रस्त्यांवर आलेले होर्डिंग्ज आदी समस्या नागरिकांनी मांडल्या.
या चर्चेत नागरिकांनाही सहभागी करून घेतल्याने नेमक्या समस्या मांडण्यात आल्या आणि त्या सोडविण्याच्या दिशेने चर्चा उपयुक्त झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सौरभ कुंडलीक, संजय कांबळे, सचिन मानवतकर, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सुभाष पाडळे, सागर मदने, विजय जाधव, महापालिकेचे अभियंता लांडे आदी उपस्थित होते.