हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पुणे शहरात झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून एरंडवणे, मुंढवा नंतर आता कोथरूड भागातही झिका विषाणूने शिरकाव केला आहे. कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतील 45 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे शहरातील एकूण झिका बाधित रूग्णांची संख्या सातवर पोहचली आहे.
शहरात साथीच्या आजारांबरोबरच झिका विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एरंडवणे परिसरात आतापर्यंत चार झिका बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या मुंढवा परिसारत दोन झिका बाधित रूग्ण आढळून आले आहेत. एरंडवणे भागात आढळून आलेल्या रूग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. त्यातच आता कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीमध्ये एका 45 वर्षीय महिलेला झिका संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या 45 वर्षीय महिलेमध्ये ताप, अंगावर लाल चट्टे, सांधेदुखीची लक्षणे असल्यामुळे या महिलेवर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
Repoter – गणेश मारुती जोशी .