हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – मंगळवारी दुपारी बारा वाजताची वेळ. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार कमला नेहरू पार्कजवळील खासगी रूग्णालयात जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.तेव्हा, आपल्या पक्षाचे जुने नेते तेथेच ऍडमिट असल्याचे त्यांना कळले.
ऍड.ए.टी.निकम यांची १९७८ पासून पवार यांच्याशी ओळख आहे. पवार यांनी ऍड.निकम यांना १९७९ ला महापालिका निवडणुकीत संधी दिली होती. १९८७ मध्ये त्यांना पवार यांनीच उपमहापौर पदी काम करण्याची सधी दिल्याची आठवण ऍड.निलेश निकम यांनी दिली.
दस्तुरखुद्द शरद पवार “साहेब’ हेच आपल्या भेटीसाठी आल्याने त्या जुन्याजाणत्या नेत्याच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळले. पवार यांनीही या नेत्याला आजारातुन लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.