हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे –पुण्यात भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन सुरू असतानाचएका कनिष्ठ अभियंत्याने चक्क ठेकेदार असलेल्या भाजपच्या एका कार्यकर्त्याला पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रविवारी दुपारी घडली.
रविवारी रात्री उशीरा याप्रकरणी पोलिसांनी पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली असून मलनिस्सारण विभागातील कामाच टेंडर मिळविण्यासाठी आता पालिकेतील अधिकारीच पिस्तुल दाखवून धमकावित असतील तर या अधिकाऱ्यावर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न विचारला जात आहे या आधी सुद्धा गणेश राजेंद्र गिते, ( कनिष्ठ अभियंता ) यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार निर्मल हरिहर हे भाजपचे कार्यकर्ते असून ते पालिकेचे ठेकेदार आहेत. रविवारी बालेवाडी येथे भाजपचे अधिवेशन होते. त्यासाठी ते रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीसाठी चालले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळा जवळ ते थांबले होते. त्यावेळी पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारे गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश गिते तेथे आले.या दोघांनी हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या पोटाला पिस्तुल लावत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर हरिहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये काही राजकीय लागेबांधे असण्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.
Repoter – गणेश मारुती जोशी .