हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी- पुणे – पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील काही भागात कंबरेइतकं पाणी साचलं आहे. तसेच सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे.
सिंहगड रस्ता इथं 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही गायब असल्याची माहिती आहे.एकता नगरी सिंहगडरोड, द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसाट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. यावर्षी पुणे महानगरपालिकेनं महापुराच्या अनुशंगाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली :-
पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली
पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत असल्याची माहिती आहे.
तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात कंबरेइतकं पाणी साचलं आहे.त्यामुळे नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. संध्याकाळी धरणातून मुठा नदीमध्ये 55 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आता तो विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6 वाजता 55000 क्यूसेक्स करण्यात आला होता . तसेच धरण परिसरात 100 मिमी व घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
या परिसरात राहणा-या लोकांनी दक्षता घेण्यात यावी
भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
शितळा देवी मंदिर डेक्कन.
संगम पूल पुलासमोरील वस्ती
कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.होळकर पूल परिसर..
पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री विक्रमी पाऊस
पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झाला आहे. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.
Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी.