हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. पुण्यातही अपघातांची मालिका सुरु आहे. पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील वारजेमध्ये १० वाहने एकमेकांना धडकली आहेत.या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. किशोर जैन वारजे येथील नागरिक यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील मुंबई-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजेजवळील हैदराबाद बिर्याणीसमोर दहा वाहने एकमेकांवर आढळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची मिळत आहे.
अपघातस्थळी नेमकं काय घडलं?
पुण्यातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या वारजे येथे १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. ही वाहने अचानक एकमेकांना कशी धडकली, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र, अपघातानंतर वाहनचालक,प्रवासी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर वारजेजवळी मुंबई-बेंगळुरु महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या विचित्र अपघातानंतर बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली. काही लोक थेट वाहनांच्या छतावर उभे राहिले. तर काही जण फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते.वारजेतील या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली.
— विनोद वाघमारे