हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – शरद पवारांनी पुण्यातल्या पोर्शे कार हिट ऍण्ड रन प्रकरणावरून अजित पवारांसोबत गेलेले आमदार सुनिल टिंगरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून निवडून आलेला आणि सोडून गेलेला आमदार स्वत:ला दमदार आमदार म्हणवतो.कल्याणीनगरमध्ये अपघतातात स्कुटरवरील दोघांचा मृत्यू झाला, त्या आरोपींना मदतीसाठी हा दिवट्या आमदार तिथे उपस्थित होता, हा कसला दमदार आमदार आहे? अशी बोचरी टीका शरद पवारांनी केली आहे.सुनिल टिंगरे हे पुण्याच्या वडगाव शेरीचे आमदार आहेत. शरद पवारांनी पहिल्यांदाच सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघात सभा घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये दुचाकीस्वार अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपीला वाचवण्यासाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन दबाव आणल्याचे आरोप केले गेले. सुनिल टिंगरे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. आपण पोलिसांवर कुठलाही दबाव टाकला नसून अपघाताची माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो, असा दावा आमदार सुनिल टिंगरे यांनी केला होता.
— गणेश मारुती जोशी ..