हिंदजागर न्युज, प्रतिनिधी – पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी कारवाईत बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल गृह विभागाकडून २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुरकुंभ एमआयडीसी, विश्रांतवाडी, धानोरी, सांगली जिल्ह्यातील कुपवाड तसेच, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या ठिकाणी छापे मारून कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रोन अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. गुन्हे शाखेने केलेल्या प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरीची गृह विभागाने नोंद घेत २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
—- गणेश मारुती जोशी.