हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील विजयातच भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या पराभवाची दाट शक्यता आणखीनच गडद झाली… होय मी बोलतोय… शिवाजीनगर विधानसभेचे विद्यमान भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या बद्दल… मोहोळ यांनी दमदार कामगिरी करत भाजपाला पुन्हा एकदा शहरात बस्तान बांधून दिलं… अगदी कसब्यातूनही त्यांना लीड मिळाल्यानं सबकुछ भाजप अशी परिस्थिती असताना शिवाजीनगर मधून लीड मिळूनही आमदार साहेबांची आमदारकी धोक्यात आहे… भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय?
हेच जाणून घेऊयात
2009 च्या विधानसभा पुनर्रचनेत शिवाजीनगर मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली… पण या मतदारसंघाने कायम युतीच्या बाजूनेच आपला कौल दिला… शशिकांत सुतार , विनायक निम्हण यांच्या आमदारकीनं मतदार संघावर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला…. भाजपच्या अनेक पदाधिकारांच्या राजकीय इच्छा आकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या… पण युतीचा धर्म पाळायचा म्हणून इथं शिवसेनेच्याच उमेदवाराला तिकीट मिळायचं आणि तो आमदार व्हायचा… टर्न टू २०१४. कायम शिवसेना भाजप अशा युतीमध्ये लढणाऱ्या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्र निवडणूक लढवली… तेव्हा त्याचे बरेच तोटे असले तरी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपला आपली ताकद आजमावता आली… त्यातही भाजपच्या बाजूने असणारे जनमत, मोदी लाट या सगळ्यांची गोळा बेरीज विजय काळे यांच्या पथ्यावर पडली… आणि 2014 ला पहिल्यांदाच शिवाजीनगर विधानसभेतून भाजपचा झेंडा आमदारकीला फडकला…
यानंतर भाजपने या मतदारसंघावरची पकड आणखीनच घट्ट करत पक्ष संघटन वाढीवर भर दिला… पक्षाची तरुण, उमदी फळी तयार केली… या सगळ्याचं रिफ्लेक्शन 2019 च्या विधानसभेलाही पाहायला मिळालं… भाजपनेही 2019 ला शिवाजीनगर विधानसभेचा चेहरा बदलून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास टाकला… अगदी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ न्याय देत शिरोळेही आमदार झाले… पण अवघ्या 5000 च्या निसटत्या लीडनं… सगळं वातावरण भाजपच्या बाजूने प्लसमध्ये असतानाही मिळालेलं हे तुटपुंज लीड पाहता भाजप हाय कमांडचाही हिरमोड झाला… अर्थात सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारी सोबतच अनेक कारण याला कारणीभूत होतीच… पण शिवाजीनगरच्या जनतेनं आम्हाला गृहीत धरत जाऊ नका.. असा जणू अप्रत्यक्ष हिसकाच या निकालातून दिला होता.. यानंतर भाजपने या निसटत्या पराभवावर बराच खल केला, पक्षाला मतदारसंघात मजबूत बनवण्यासाठी मागील पाच वर्षात बरेच प्रयत्न झाले, विकास कामे मार्गी लावण्यात आली… स्वतः आमदार साहेब शिरोळे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरची जनता मोहोळांच्या पाठीशी रेकॉर्ड ब्रेक लीड देईल, हे त्यांनी बोलू नाही दाखवलं होतं… त्यांचा त्यांच्या कामावर – आणिमतदारसंघातील आपल्या ताकदीवर मोठा विश्वास होता… पण गेम उलटाच झाला… मुरलीधर मोहोळ निवडून आले खरे पण शिवाजीनगर मतदारसंघातून ते अवघं चार हजार च्या आसपास लीड घेऊन थांबले… या निकालाचं साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करायचं झालं तर येणाऱ्या विधानसभेला सिद्धार्थ शिरोळे यांचे आमदारकी काठावर किंवा धोक्यात तर आहेच, पण सोबतच भाजपचा शिवाजीनगरचा बालेकिल्लाही ढासळण्याची शक्यताही नाकारता येत नाही…
औंध, भोसलेनगर, मॉडर्न कॉलनी, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायटीचा भाग… हा शिवाजीनगर मतदारसंघातला भाजपचा कोअर ओटर… हा नेहमीच भाजपाला मतदान करत आलाय… पण सुशिक्षित मतदारांची संख्या जास्त असल्याने या पट्ट्याला ग्राह्य धरता येत नाही… दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, खडकी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, बोपोडी, झोपडपट्टी आणि वस्ती भाग इथला मतदार हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार राहिलाय… इथला मतदानाचा टक्का वाढला की समजायचं भाजपाचा इथे करेक्ट कार्यक्रम झाला… त्यात भाजपच्या कोअर ओटरने मतदानाकडे फिरवलेली पाठ इथे लोकसभेला काँग्रेसच्या पथ्यावर पडताना दिसली… हाच ट्रेंड कायम राहिला तर विधानसभेला इथं काँग्रेसचा आमदार विजयाचा गुलाल उधळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको…
काँग्रेसकडून दत्ता बहिरट हे विधानसभेला इच्छुक आहेत.. दलित – मुस्लिम आणि काँग्रेसचा पारंपारिक वोटर हा यंदा काँग्रेसच्या पाठीशी असल्याने आणि त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मारक ठरणार नसल्याने मतदार संघातून काँग्रेसला विजयाचे चान्सेस जास्त आहेत… पण भाजप आपल्या हा हक्काचा मतदारसंघ सहजासहजी आपल्या हातातून निसटू देणार नाही… त्यामुळे शिरोळे यांना जास्तीत जास्त बळ देऊन ते निवडणूक रिंगणात उतरतील की नव्या चेहऱ्याला संधी देतील, हे येणारा काळच ठरवेल… त्यामुळे भाजप आपल्या हक्काचा पारंपारिक मतदारसंघ यंदाही कायम राखून प्रतिष्ठा वाचवणार की काँग्रेस याला फाटा देत शिवाजीनगरमधून आमदारकीचा गुलाल उधळणार ? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
— गणेश मारुती जोशी..