हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय आणखी काही फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील, असं दिसतंय. आम्हाला लोकशाहीमध्ये किंमत नाही.आम्ही निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहात…आता पुण्यातल्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये बॅनर्स झळकले आहेत.
छत्रपती शिवाजीनगर येथील प्लॉट ३९१,माती वडार को.ऑप.हौसिंग सोसायटी, यांनी योजनेला (SRA Scheme) तीव्र विरोध केला आहे.स्थानिक रहिवाशांनी ” लोकशाही मध्ये किंमत नाही.आम्ही निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहात ” असे फलक जाहीर करून ठामपणे विरोध करत ही योजना थांबवण्यास भाग पाडणार आहे.
छत्रपती शिवाजीनगर येथील मोक्याच्या ठिकाणी माती वडार को.ऑप.हौसिंग सोसायटी,प्लॉट ३९१ आहे झोपडपट्टीपुनर्वसन प्राधिकरण (SRA) पुणे व पुणे महानगरपालिका आणि बिल्डर यांच्या संगनमताने काही राजकीय कार्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करत आहे. तथापि, यासाठी एक विकासक दिशाभूल करत आहे आणि स्थानिक रहिवाशांना धमकावून झोपू योजना (SRA Scheme) तिथे प्रस्तावित करत आहे, या भूखंडावर कोणत्याही झोपडपट्टीपुनर्वसन प्राधिकरण (SRA) करू नये असे येथील रहिवासी राजेश जाधव यांनी म्हटले आहे तसेच निम्म्याहुन आधिक लोकाना घरे नाकारण्यात आली आहेत. खोटे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे.काही लोकांकडून जबरदस्तीने हमीपत्रे घेतली आहेत.झोपडपट्टीपुनर्वसन प्राधिकरण (SRA) पुण,
पुणे महानगरपालिका आणि बिल्डर यांच्या संगनमताने आमची राहती घरे तोडण्यासाठी नोटीसाही काढण्यात आल्या आहेत असे आरोप राजेश जाधव यांनी पुढे केले.आम्हाला लोकशाहीमध्ये किंमत नाही.आम्ही निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहात… पुनरविकासाच्या नावाखाली खोटीकागदप्रेतयार करून आम्हाला बेघर करून आमची खाजगी मालमत्ता हडपक रण्याचा डाव आहेः हा लाकशाहाचा गळा घोटण्याच्या प्रकार असून आ्हा वडार समाजातील गरीबांना देशोधडीला लावले जात आहे.म्हणूनच आम्ही ७०० हुन अधिक गरीब वडारासी मतदार येत्या विधानसभा निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहोत अशा तीव्र शब्दात विरोध केला आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
—– गणेश मारुती जोशी.