HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील काही मतदारसंघात महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघ महायुतीकडून होल्डवर ठेवण्यात आला आहे.वडगावशेरीत विद्यमान आमदार सुनील टिंगरे सध्या अजित पवार गटात आहेत. तर खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान न दिल्याने महायुतीत मतदारसंघ ‘अदला बदली’ची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे बॅक फुटवर गेल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात मतदारसंघातील वातावरण विरोधात गेल्याचाही माहिती सर्व्हेत आली आहे. याच मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक विधानसभेसाठी इच्छूक आहेत. मुळीक यांनी लोकसभेची देखील तयारी सुरू केली होती. मात्र त्यात त्यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत टिंगरेंचं नाव न आल्याने मुळीकांची आशा चांगलीच वाढली आहे.
दुसऱ्या बाजूला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर अवघ्या काही मतांनी निवडून आलेत. भाजपने अलिकडेच केलेल्या सर्व्हेत भीमराव तापकीर मतदारसंघात निगेटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे भीमराव तापकीर यांना विधानसभेतून डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. यातच भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत देखील त्यांना स्थान देण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, खडकवासला मतदारसंघात अजित पवार गटाकडून माजी नगरसेवक दिलीप बराटे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासह माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी देखील विधानसभेसाठी दंड थोपाटले आहेत. आता वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघात पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना स्थान न दिल्याने भाजप आणि अजित पवार गट मतदारसंघ आदला बदली करणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
—– Ganesh Maruti Joshi.