HindJagar News – Repoter – Pune – विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी तसेच अन्य पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार यादीनंतर काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवार यादी मध्ये ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. धारावीतून खासदार वर्षा गायकवाड यांच्या बहिण डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात – संगमनेर, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली, अमरावतीमधून डॉ. सुनील देशमुख तर नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडदे यांना उमेदवारी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये बरीच सुंदोपसुंदी सुरू होती. एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्ष हे स्वबळाची भाषा करत असल्याची कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करून या सगळ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने काल (23 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
एकीकडे भाजप हे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडमध्ये मागीला काही दिवस हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच होतं. पण आता काँग्रेसने शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह महायुतीला टक्कर देण्याची तयारी केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून बरेच अंदाज बांधले जात होते. अखेर आता काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं चित्र हे काहीसं स्पष्ट झालं आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं
के. सी. पाडवी : अक्कलकुवा
राजेंद्र गावीत : शहादा
किरण तडवी : नंदूरबार
श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर
प्रवीण चौरे : साक्री
कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
धनंजय चौधरी : रावेर
राजेश एकडे : मलकापूर
राहुल बोंडरे : चिखली
अमित झनक : रिसोड
विरेंद्र जगताप : धामणगाव रेल्वे
सुनील देशमुख : अमरावती
यशोमती ठाकूर : तिवसा
अनिरूद्ध देशमुख : अचलपूर
रंजित कांबळे : देवळी
प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम
बंटी शेळके : नागपूर मध्य
विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
नितीन राऊत : नागपूर उत्तर
नाना पटोले : साकोली
गोपालदास अग्रवाल : गोंदीया
सुभाष धोते : राजूरा
विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी
सतीश वारजूकर : चिमूर
माधवराव पाटील: हदगाव
तिरूपती कोंडेकर : भोकर
मिनल पाटील: नायगाव
सुरेश वरपुडकर: पाथरी
विलास औताडे : फुलंब्री
सय्यद हूसेन : मिरा भाईंदर
अस्लम शेख : मालाड पश्चिम
आरीफ खान : चांदीवली
ज्योती गायकवाड : धारावी
अमिन पटेल : मुंबादेवी
संजय जगताप : पूरंदर
संग्राम थोपटे : भोर
रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
विजय थोरात : संगमनेर
प्रभावती घोगरे : शिर्डी
धीरज देशमुख : लातूर ग्रामीण
अमित देशमुख : लातूर शहर
सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट
पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण
ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण
राहुल पाटील : करवीर
राजू आवळे : हातकणंगले
डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव
विक्रमसिंह सावंत : जत
—— Ganesh Maruti Joshi.