HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज (४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती.काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत तर काहीजण नॉट रिचेबल आहेत. दरम्यान आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही अनेक ठिकाणी एकमेकां विरोधात उमेदवार दिले आहेत. यंदा सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्याही जास्त होती.
पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांत इच्छुकांनी बंड केले, तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले. अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्याने हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील होता. मात्र काही जागांवर पक्ष श्रेष्ठींना यश तर काही जागांवर अपयश आले आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदासंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून दत्ता बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरोळे आणि बहिरट यांच्यात पुन्हा सामना रंगणार अशी चर्चा होती. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी केलेली आहे. दरम्यान आज (दि.४) त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. दरम्यान आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने या मतदारसंघात तिहेरी निवडणूक होणार आहे.
——– Ganesh Maruti Joshi.