HindJagar News – Repoter – PUNE – सर्वसाधारणपणे संयमी स्वभाव, कधीही न रागावणारे अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे मात्र चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. बीकेसीमधील महाविकास आघाडीच्या सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षकांना मुंबई पोलिसांनी अडवल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच भडकले.आत घ्या सगळ्यांना पहिला, कोण आहे तो त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. शेवटी एका पोलिस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी निघून गेले.
मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि इतर नेते उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे काहीसे उशीला पोहोचले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते.
बीकेसीच्या सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवले, त्यांना आत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले. सुरक्षारक्षकांना पहिला आत घ्या असं सांगत उद्धव ठाकरे चांगलेच भडकले. त्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने संबंधित पोलिसांना सांगतो असं म्हटल्याचं ऐकू येतंय.
कोण आहे तो? नाव घ्या त्याचं लिहून
उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवल्यानंतर त्या ठिकाणी गोंधळ झाला. उद्धव ठाकरे पोलिसांना उद्देशून म्हणाले की, कोण आहे तो? त्याचं नाव घेऊन ठेवा. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यानेही यावेळी नाराजी व्यक्त केली. ‘गवळी, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय’ असं त्या कार्यकर्त्याने पोलिसांना उद्देशून वक्तव्य केलं.
नेहमी भाषणात आक्रमक भूमिका घेणारे उद्धव ठाकरे इतर वेळी मात्र संयमी भूमिका घेताना दिसून येतात. सुरक्षारक्षकांना अडवल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंना भडकल्याचं पाहून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये मात्र शांतता पसरल्याचं दिसून आलं.
उद्धव ठाकरेंची महायुतीवर घणाघाती टीका
महाविकास आघाडीच्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीनंतर एक तरुण बेरोजगार होणार आहे असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी जहरी टीका केली.
——– Ganesh Maruti Joshi.