HindJagar News – Repoter – PUNE – महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे.’महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का?’ असा एकेरी उल्लेख करत खोत यांनी शरद पवारांवर टीका केल्याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांच्या पक्षाने सदा भाऊ खोत यांच्याबरोबरच मंचावर बसून हसणाऱ्यांनाही लक्षात ठेऊ असा सूचक इशारा दिला आहे. या नव्या इशाऱ्याचा रोख हा सारा प्रकार घडला तेव्हा मंचावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच गोपीचंद पडाळकरांच्या दिशेनेच असल्याचं स्पष्ट होत आहे.
अजित पवार संतापले
‘ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” अशी पोस्ट अजित पवारांनी शेअर केली आहे.
अजित पवारांच्या पक्षाकडून सूचक इशारा
अजित पवारांबरोबरच त्यांच्या पक्षातील अन्य नेते दिलीप वळसे-पाटील आणि अमोल मिटकरींनीही या टीकेवरुन आक्षेप नोंदवला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते असलेल्या अमोल मिटकरींनी तर, “बोलणारा आणि हसणारे दोघेही लक्षात ठेवतो आहोत. तुर्तास इतकेच…!” असं म्हणत खोत यांच्या या वादग्रस्त भाषणाच्या व्हिडीओची क्लिप शेअर केली आहे. ‘कॅन्सरसारख्या जीवघेण्या संकटावर मात करुन पवार साहेबांनी अनेक कॅन्सरग्रस्तांना प्रेरणा दिली,’ अशी ओळ या व्हिडीओवर लिहिलेली आहे.खोत यांनी शरद पवारांवर केलेली टीका ऐकून मंचावर उपस्थित असलेले गोपीचंद पडाळकर हसताना दिसले. तसेच हे भाषण सुरु असताना देवेंद्र फडणवीसही कॅमेरात टीपले गेले.
काय म्हणाले खोत?
सांगलीमधील जत येथे आयोजित महायुतीच्या सभेत बोलताना सदा भाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी टीका त्यांनी केली.
——– Ganesh Maruti Joshi.