HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पुण्यातील स्वारगेट परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मुलांना ठार मारण्याची धमकी देत एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी मूळचे राजस्थान येथील रहिवाशी आहेत. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने राजस्थानात जाऊन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात सोहेल सबीक खान (वय, 20), कालू आबन खान (वय, 50) आणि दिलदार खाजू खान (वय, 27) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त आले होते पुण्यात
पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त पुण्यात आले होते आणि ते स्वारगेट येथील एका वसाहतीत भाड्याने राहत होते. दरम्यान, जून महिन्यात आरोपी सोहेल पीडिताच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास मुलांना जीवे मारू, अशी धमकी त्याने पीडिताला दिली. यानंतर आरोपी कालू आणि सोहेल यांनी देखील तिला धमकावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता आपल्या मूळ गावी निघून गेली. त्यावेळी तिसरा आरोपी दिलदारने फोनद्वारे पीडिताशी संपर्क साधला. तसेच या घटनेची पोलिसांना माहिती देऊ नको, अशी धमकी दिली.हा सर्व प्रकार असहाय्य झाल्याने पीडित महिलेने राजस्थानला पोहचल्यानंतर तेथील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण स्वारगेट पोलिसांकडे वर्ग केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत.
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
पुण्यासह राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. दररोज कुठे न कुठे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. यात अल्पवयिन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण लक्षणिय आहे. नुकतेक, मुंबईतील एका अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अत्याचाराच्या या घटना लक्षात घेता महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी सर्वत्र.
——– गणेश मारुती जोशी.