HindJagar News – Repoter – PUNE – राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. पुणे जिल्ह्यात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत ५४.७४ टक्के इतके मतदान झाले हाेते. यामुळे वाढलेला टक्का काेणाच्या पारड्यात पडणार यावर निकाल अवलंबुन आहे. आता शनिवारी हाेणाऱ्या मतमाेजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किरकाेळ प्रकार वगळता पुणे जिल्ह्यात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्राच्या तुलनेत नंतरच्या सत्रात मतदानाचे प्रमाण वाढत गेलेे. सकाळी उत्साहात मतदानाची प्रक्रीया सुरु झाली, पण मतदान केंद्रावर तुलनेत गर्दी कमी हाेती. सकाळी ७ ते ९ यावेळेत सरासरी साडे पाच टक्के मतदान झाले. त्यानंतर प्रत्येक दाेन तासाच्या आकडेवारीत वाढ हाेत गेली. दुपारी तीननंतर मात्र ही मतदान केंद्रावर गर्दी वाढत गेली. सांयकाळी पाच पर्यंत जिल्ह्यात एकुण ५४.०९ टक्के इतके मतदान झाले हाेते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यात एकुण ८८ लाख ४९ हजार ५९० इतके मतदार होते.
वेळेनुसार वाढ झालेले मतदान आणि कंसात एकुण टक्केवारी
स. ७ ते ९ वाजेपर्यंत : ५.५३ टक्के
स. ९ ते ११ वाजेपर्यंत :१०.११ ( १५.६४)
स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत : १३.३९( २९.०३)
दु. १ ते ३ वाजेपर्यंत : १२.६७ ( ४१.७०)
दु. ३ ते सांय.५ वाजेपर्यंत : १२.३९ ( ५४.०९)
क्षणचित्रे
कोथरूड, मंगळवार पेठेत ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गाेंधळ निर्माण झाला हाेता. यामुळे मतदारांची गैरसाेय झाली.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केंद्रावर जाऊन बजाविला मतदानाचा हक्क
मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि सिध्दार्थ शिराेळे यांच्या विजयाचे फलक झळकले.
घे भरारी आणि ग्राहक पेठेतर्फे सकाळी ७ ते १० यावेळेत मतदान करणाऱ्यांना माेफत चहा आणि नाष्टा तृतीय पंथीयांकडून मतदानात सहभाग मतदान केंद्रातील पाळणाघराच्या सुविधेचा फायदा पाळणाघरातील खेळण्याचा लहानमुलांनी घेतला आनंद
खडकवासला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दाेडके यांनी काढली विजयी मिरवणुक.
——– Ganesh Maruti Joshi.