HindJagar News – Repoter – PUNE – पुरंदर तालुक्यातील महत्त्वकांक्षी असलेला गुंजवणीचा प्रकल्प त्याचबरोबर तालुक्यातील रस्ते ग्रामीण रुग्णालय यासारख्या मूलभूत असणार्या सुखसुविधा पुरविण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री व पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली.
सासवड येथील भाजपच्या कार्यालयामध्ये पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी कामठे बोलत होते. यावेळी पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, माजी कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, दिलीप कटके, संदीप देवकर, मंगल पवार, रोहीदास खेसे, संदीप कटके, मयूर जगताप, श्रीकांत ताम्हणे, श्रीकांत थिटे, सत्येंद्र जेधे, बाळासाहेब भोसले, महादेव शेंडकर, सचिन पठारे उपस्थित होते.
जालिंदर कामठे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजय शिवतरे यांचे काम केले असून या कार्यकर्त्यांना भविष्यात सर्वतोपरी ताकद पुरवली जाईल व कार्यकर्त्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली जाईल.
पुरंदर तालुक्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी सत्तेच्या माध्यमातून अधिकाधिक वेळ देऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.
– अशोक टेकवडे, माजी आमदार
——– Ganesh Maruti Joshi.