HINDJAGAR- NEWS – MUMBAI – मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून तिसऱ्यांदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. अतुल पाटणे यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर नावाजलेले अधिकारी रामास्वामी एन यांची बदली कृषि विभागात करण्यात आली आहे.
1. श्री अतुल पाटणे (IAS:RR:1999) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्रीमती ऋचा बागला (IAS:RR:1999) यांना प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
3. श्रीमती अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्री एन. नवीन सोना (IAS:RR:2000) प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (माननीय श्री एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (ADF) कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6. श्री वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7.श्री प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. श्री माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन वेळा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. मंत्र्यांनी खात्यांची जबाबदारी घेतल्यानंतर विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने चर्चेचा विषय ठरतो आहे.
News Repoted By – P. S. SURYANSHI..