हिंदजागार प्रतिनिधी –
राज्यासह देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे.करोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्यानं या लशींचं उत्पादनही थांबवण्यात आलं होतं. पण आता हे उत्पादन पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.
कोव्हिशिल्ड लशीचं उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं देखील या लशीचं उत्पादन पुन्हा सुरु केलं आहे. पुढील ९० दिवसांत अर्थात तीन महिन्यात ६ ते ७ मिलियन अर्थात ७० लाख कोविशिल्ड लशीचे डोस तयार करण्याचं आमचं टार्गेट असल्याची माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत १,११५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५६० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५४२१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के असून मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे.
तसेच राज्यातील बडी शहरं असलेल्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथल्या विमानतळांवर परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची स्क्रीनिंग केलं जात आहे. या सर्वांचं थर्मल स्कॅनिंग केलं जात असून यांपैकी २ टक्के प्रवाशांची रँडमली कोविड चाचणीही केली जात आहे.
- श्री.विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )