हिंदजागर प्रतिनिधी – पुण्यातल्या विविध पक्षांतल्या नेत्यांना गेल्या काही दिवसांत खंडणीसाठी धमक्या येण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हे काम पुण्यातलाच एक व्यक्ती करत असल्याचं समोर आलं आहे. पण धमकी देणाऱ्याने असं का केलं? याबद्दलही एक वेगळंच कारण समोर आलं आहे.
एकाच महिन्यात पुण्यातल्या ४ नेत्यांना असे फोन आले आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे तर मनसेचे नेते वसंत मोरे यांना मागच्या महिन्यात फोन आले होते. पोलिसांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेत, या प्रकरणात २ जणांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव इम्रान शेख असं असून त्याचा साथीदार शाहनवाज खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
इम्रान शेख पुण्यातच राहतो. तो एक विवाह नोंदणी केंद्र चालवतो. तिथे एका मुलीने लग्नासाठी नोंदणी केली होती. मात्र, इम्रान स्वतःच या मुलीच्या प्रेमात पडला. पण या मुलीने त्याला नकार दिला. या रागातून इम्रानने तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. या मुलीचे फोटो, फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल केला. तिच्याच नावाने इम्रानने राजकीय नेत्यांना खंडणी मागण्यास सुरुवात केली. मात्र पुणे पोलिसांनी त्याला शोधून काढलंच.
- श्री विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )