हिंदजगर न्यूज प्रतिनिधी – ससून हॉस्पीटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार घेताना मोठं ड्रग्ज रॅकेट चाविणारा तसेच ससूनमध्ये बंदोबस्त डयुटीवर असलेल्या गार्ड पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पलायन करणार्या ललित अनिल पाटील प्रकरणात कर्तव्यात कसूर करून हालगर्जीपणा केल्यामुळे पुणे पोलिस दलातील एका महिला पोलिस अधिकार्यासह 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.महिला पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे , पोलिस हवालदार आदेश सिताराम शिवणकर , पोलिस नाईक नाथाराम भारत काळे, पोलिस कर्मचारी पिरप्पा दत्तु बनसोडे , अमित सुरेश जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश जनार्दन काळे , पोलिस कर्मचारी विशाल बाबुराव टोपले , स्वप्निल चिंतामण शिंदे , दिगंबर विजय चंदनशिव (सर्व नमणूक-कोर्ट कंपनी, पुणे शहर पोलिस दल) अशी तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया आणि मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे. ससून हॉस्पीटलमध्ये ड्रग्ज आल्याप्रकरणी चौघा पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे ससूनमध्ये येणार संशयास्पद वस्तू चेक करण्याची जबाबदारी होती.दोन दिवसांपुर्वीच ससून रूग्णालयाच्या गेटवर तब्बल 2 कोटी 14 लाखाचे अंमली पदार्थ सापडले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती. त्यानंतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील ललित अनिल पाटील यांनी ससून मधून पलायन केले आहे. त्यामुळे सध्या पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान, ललित पाटील हा ससूनमधून पलायन करताना तो ससून रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला आहे. त्याचे व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
कर्तव्यात कसूर केली अन् हलगर्जीपणा देखील, पण….
दरम्यान, ससूनमधून ललित पाटील याने पलायन केल्यामुळे महिला पोलिस उपनिरीक्षकासह 9 पोलिसांना निलंबीतकरण्यात आले. मात्र, ससूनमध्ये अनेक हायप्रोफाईल आरोपी आहेत. त्यांच्या दिमतीला अनेक पोलिस असतात.त्यांच्याकडे मोबाईल फोन आणि लॅपटॉप याच्यासह अनेक वस्तू असतात.त्यांना वेगवेगळया सुविधा देखील पुरविण्यात येतात. अगदी जवळच असलेल्या लॉजपर्यंत देखील त्यांची मजल जाते.हे कोणा एका पोलिस कर्मचार्यामुळे होणे शक्य नाही.त्यामुळे कर्तव्यात कसूर करणार्या तसेच कामात हलगर्जीपणा करणार्यांवर निलंबन झाले पण जे याहायप्रोफाईल गुन्हेगारांना रेड कार्पेट टाकतात त्यांचे काय हा खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
अंमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी ललित पाटील हा गेल्या काही महिन्यापासुन ससूनमध्ये उपचार घेत होता. या कालावधीमध्ये त्याला अनेक पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकारी भेटण्यास येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी नेमकं कशासाठी ललित पाटील याला भेटायला ससूनमध्ये जात होते. त्यांचे नेमके काय लागेबांधे होते हे सखोल तपासाअंती समोर येणारच आहे मात्र सध्या तरी अनेकांनी गणपती पाण्यात ठेवले आहेत.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक वार्ताहर )