हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – लोकसभा २०२४ साठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने महाराष्ट्र महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ काम सुरु केले आहे. तर इंडिया आघाडी देखील ताकदीने मैदानात उतरणार आहे.दरम्यान मनसे लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे.मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. यामध्ये पुण्यातील उमेदवाराचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.मनसे कल्याण, ठाणे, पुणे, संभाजी नगर, सोलापूर यासह एकूण ९ लोकसभा मतदार संघात चाचपणी करत आहे.
मनसेने पुण्यात वसंतराव मोरे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यात वसंतराव मोरे यांची लोकप्रियता बघता प्रतिष्ठीत उमेदवाराच्या देखील अडचणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.